शरद पवारांची महामुलाखत सुप्रिया सुळेंनी मोबाईलवर पाहिली

 पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली या मुलाखतीकडं सा-या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. मात्र पवारांच्या सुकन्या आणि राष्ट्रवादी च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोबाईलवरच ही मुलाखत पाहिली.

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयेाजन करण्यात आलं होत. राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. पवारांनीही सडेतोड आणि दिलखुलास उत्तरे दिली. मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. आक्रमक, बेधडक आणि बोचऱ्या बोलण्यासाठी राज ठाकरे प्रसिद्ध तर मुत्सद्दी, मिश्किल आणि अनेक अर्थ निघू शकतील अशा धोरणी वक्तव्यांची पवारांची ख्याती या दोनही गोष्टींचा प्रत्यय आज पुण्यात झालेल्या मुलाखतीत आला. मुलाखतीच्या शेवटी राज ठाकरेंनी शरद पवारांचं व्यंगचित्र रेखाटलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *