डोंबिवली : डोंबिवली पश्चिम नवापाडा येथील रहिवाशी ज्येष्ठ समाजसेविका तथा नामवंत वकील प्रदीप एकनाथ बावस्कर यांच्या मातोश्री सुमन बावस्कर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक ३० जून २०२४ रोजी  निधन झाले. त्यांच्या निधनाने बावस्कर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कै. सुमन बावस्कर यांना समाजसेवेची खूप आवड होती तसेच समाजात त्यांना सर्वजण माई म्हणून ओळखत होते त्यांच्या प्रती असलेली समाजसेवेची भावना, दयाळू व कष्टाळू स्वभावामुळे त्यांना जिजाबाई पुरस्कार तसेच आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांची ओळख. मैत्री कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी खूप काम केले.

कै. सुमन बावस्कर यांचे पती पोलीस अधिकारी होते त्यांच्या मृत्यू पक्षात त्यांनी स्वतःच्या हिमतीवर काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण दिले. आज त्यांचा एक मुलगा प्रदीप बावस्कर हे नामवंत वकील तर दुसरा मुलगा पोलीस खात्यात अधिकारी असून, एक मुलगी टाटा हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स तर दुसरी मुलगी शिक्षिका आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये बाबासाहेब कुटुंबियांची खासियत म्हणजे आज त्यांचे एकत्रित कुटुंब पद्धत असून त्यांची मुले हे त्यांना अगदी फुलाप्रमाणे जपत होती.

ॲड. प्रदीप आणि संतोष ही त्यांची दोन्ही मुले दरवर्षी 2 ऑक्टोबर आईचा वाढदिवस मोठ्या धुमधडाकात साजरा करायचे. बावस्कर आईचा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. समाजसेवक विकास गजानन म्हात्रे तसेच प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी तर त्यांना आईच मानले होते.

कै सुमन बावस्कर यांचे अंत्यसंस्कार विधी गणेश घाट कुंभारखान पाडा डोंबिवली पश्चिम येथे पार पडले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. दशक्रिया विधी दिनांक 9 जून रोजी गणेश घाट येथे करण्यात येणार असून, तेरावे हे त्यांच्या राहत्या घरी नवापाडा येथे करण्यात येणार आहे.  मुलांनी आईची हुबेहूब मूर्ती त्यांच्या घरात स्थापन करण्याचे ठरविलेले आहे समाजात एक आदर्श कुटुंब म्हणून श्रीमती सुमन बावस्कर यांच्या कुटुंब यांची गणना केली जाते.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!