ज्येष्ठ समाजसेवक सुभाष महाजन यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार जाहीर
डोंबिवली : ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक सुभाष महाजन यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आलाय. गेल्या १२ वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्रिडा आणि सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अविष्कार फाऊंडेशनच्या सातारा जिल्हा शाखेच्यावतीने हा पुरस्कार जाहिर करण्यात आलाय. रविवार १२ मे रोजी सकाळी ११ वाजता वेणूताई चव्हाण स्मारक, शिवाजी स्टेडीएमजवळ कराड जिल्हा सातारा येथे पुरस्कार सोहळा होणार आहे. अशी माहिती अविष्कार संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रमोद ताईगडे व जिल्हा सचिव ज्ञानेश्वर कल्याणकर यांनी कळविले आहे.
डोंबिवलीकर रहिवाशी असलेले महाजन हे स्टेट बँक कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत. तसेच विविध संस्था आणि संघटनेवर तसेच शासकीय कमिटीवर कार्यरत आहेत. महाजन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्यावतीने राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तसेच भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची आजीव मेंबरशिप त्यांना प्रदान करण्यात आलीय. तसेच मराठी वृत्तपत्रलेखक संघ यांच्या वतीने देण्यात येणार यंदाचा ‘ पत्रभूषण २०१८ ‘ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. महाजन हे अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.