डोंबिवलीकर सुभाष महाजन यांना भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबध परिषदेची आजीवन मेंबरशिप
डोंबिवली : बँक कर्मचारी सेनेचे नेते सुभाष महाजन यांना भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतीक संबध परिषदेची आजीवन मेंबरशीप प्रदान करण्यात आलीय. परिषदेचे सिनिअर प्रोग्रॅम डायरेक्टर एस भाटीया यांनी त्यांना आजीवन मेंबरशिप दिल्याचे एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय अंतर्गत भारतीय सांस्कृतीक संबध परिषदेचे कामकाज चालते . परिषदेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे.भारत आणि इतर देशातील सांस्कृतीक संबध वाढविणे, इतर देशांच्या जनतेबरेाबर सांस्कृतिक आदान प्रदान करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतीक क्षेत्रात संबध प्रस्थापित करणे कार्यक्रमाचे आयोजन करणे अशा प्रकारे परिषदेचे काम केले जाते. सुभाष महाजन हे डोंबिवलीत राहत असून, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच विविध संस्थावर आणि संघटनेवर आणि शासकिय कमिटीवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाजन यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक संबध परिषदेची आजीवन मेंबरशिप मिळाल्याने त्यांचे सर्वत्रच अभिनंदन होत आहे.