खोपोली – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांची ही बस रायगड किल्ला येथे चालली होती. वाटेत खोपोलीजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या उतरंडीच्या भागात जाऊन उलटली.मुंबई -पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. तर शिक्षक आणि विद्यार्थी असे मिळून पाच जणांना किरकोळ जखमा झाल्या. या बसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असे ४९ जण होते. ते सर्व सुखरुप वाचले.आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने गगनगिरी आश्रमात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *