भिवंडीत दुकानाला भीषण आग ;लाखोंचे नुकसान 

भिवंडी  : शहरातील नवीवस्ती ,केजीएन चौक येथे कटलरी व जनरल स्टोर्स दुकानाला आग लागल्याने या आगीत लाखोंचे कटलरी व फर्निचर सामान जळून खाक झाल्याची घटना  घडली आहे. सतीश नरसय्या सुनकरपेल्ली  ( रा.पद्मानगर ) यांचे नवीवस्ती येथे ओमसाई नांवाचे जनरल स्टोर्स असून त्यांनी दुपारी जेवणासाठी दुकान बंद करून घरी गेले होते. परत येताना दुकानातून धूर निघत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी कळवल्याने ते तत्काळ दुकानात पोहचले, दुकानाचे शटर उघडून शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र दुकानातील वह्या ,पुस्तके ,प्लास्टिक कटलरी ,कॉस्मेटिक सामान व लाकडी फर्निचर आगीच्या विळख्यात सापडल्याने दुकानातील सुमारे साडेचार लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. या आगीच्या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलास मिळताच अग्निशमन दल दोन अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी धाव घेवून आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले.त्यामुळे या आगीतून आजूबाजूची दुकाने व नागरी वस्ती सुदैवाने बचावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *