डोंबिवली , दि,18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचेनेनुसार अयोध्या येथे येत्या सोमवारी श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
या मंगलदिनी प्राणप्रतिष्ठापणा उत्सवा निमीत्त कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका क्षेत्रातील मटन, चिकन, मच्छी, चायनीज तसेच देशी व विदेशी मद्य व्यवसाय विक्री बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
याविषयी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे बोलताना ते म्हणाले, श्री क्षेत्र आयोध्या धाम येथे श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवार 22 जानेवारीला होणार आहे. आपल्या हिंदु धर्म संस्कृती प्रमाणे संपूर्ण देशभर घरोघर मोठ्या आनंदात उत्सव साजरा करण्यात येत आहे.
धार्मीक कार्य असल्यामुळे आपल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मटन, चिकन, मच्छी, चायनीज, मासंहार हॉटेल व धाबे तसेच देशी व विदेशी मद्य (दारु) विक्री हे व्यवसाय सोमवार 22 जानेवारी रोजी बंद ठेऊन श्री क्षेत्र आयोध्या येथील श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास व हिंदू संस्कृती उत्सवास सहकार्य करण्यासाठी आपल्या केडीएमसी कडून सदर व्यवसायकांना व्यवसाय बंद ठेवण्याची आदेश देण्यात यावेत अशी विनंती आयुक्तांना केली आहे.
तसेच व्यावसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या दिवशी आपले दुकाने बंद ठेवावे आणि भारताच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होवून सहकार्य करावे असे शहर प्रमुख मोरे यांनी सांगितले.