डोंबिवली : पश्चिमेतील शास्त्रीनगर कोपर रोड भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरी भेटण्याचे निमित्त करून जाऊन घरातील लाकडी कपाटातील मंगळसूत्र एका सोनाराने चोरून नेले आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात हा प्रकार घडला आहे.
पश्चिमेकडील शास्त्रीनगर भागात चक्रवर्ती कुटुंब राहते. गेल्या दोन महिन्याच्या काळात आरोपी सोनार दीपक धनीराम प्रजापती (२६, रा. झांसी, उत्तरप्रदेश) हा तक्रारदार खुशनम प्रेमचंद चक्रवर्ती (३३) यांच्या घरात आला. त्याने तक्रारदारांच्या स्वयंपाक घरात जाऊन तेथील लाकडी कपाटात ठेवलेले एक लाख ८० हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र ताब्यात घेतले.
खुशनम यांच्या आईने आरोपी दीपक प्रजापती याला घरातून तू मंगळसूत्र का चोरून नेत आहेस, ते आहे त्या जागी ठेव, अशी तंबी दिली. त्यावेळी तक्रारदाराच्या वृध्द आईला न जुमानता आरोपी सोनाराने तुम्ही जर या बद्दल कुणास काही बोलला, किंवा कुठे तक्रार केली तर तुमच्या एकाही सदस्याला सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो घरातून पळून गेला. वारंवार मंगळसूत्र देण्याची मागणी करून सोनार ते परत देत नसल्याने अखेर तक्रारदार खुशनम यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तकारुवरून गुन्हा नोंदवून पोलिस चोराचा शोध घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!