केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले येणार

डोंबिवली : राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 31 मार्च रोजी ही परिषद डोंबिवलीत होत असून पूर्वेकडील स. वा. जोशी हायस्कूलच्या प्रांगणात बुद्धम् शरणंम् गच्छामि या बुद्धवंनेसाठी धम्मबांधव मोठ्या संख्येने बौद्ध धम्म परिषदेसाठी उपस्थित राहतील. तसेच समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी परिषदेचे स्वागताध्यक्ष माणिकराव उघडे, कार्याध्यक्ष अशोक प्रगारे, सचिव गुणाजी बनसोडे, किशोर पगारे, नंदा लोखंडे, मीना साळवी, कोषाध्यक्ष अशोक कापडणे, सचिन साळवी, उपाध्यक्षा प्रमिला सावंत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
धम्म परिषदेसाठी उद्घाटक म्हणून भंते महातेरो ज्ञानज्योती आणि अभिनेते गगन मलिक उपस्थित राहणार आहेत.

सकाळी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन समाजभूषण प्रल्हाद जाधव करणार आहेत. परिषदेमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर परिसंवादाच्या माध्यमातून धम्म विषयी मार्गदर्शन मिळणार आहे. या परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात एकपात्री प्रयोग होणार असून स्पिरिट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार याविषयी देखील कार्यक्रम होणार आहे.

समारोपाच्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि भगिनी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. तर रात्री अरविंद मोहिते प्रस्तुत धम्मपद या वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे.

बौद्ध धम्माची शिकवण आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावे, या अपेक्षेने एक दिवस धम्म ज्ञार्जित करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन धम्म परिषदेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!