मुंबई दि.  २१ – ठाणे येथील तरुणीवर जीवघेणा हल्ला प्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसमोर समक्ष व्यक्तिशः उपस्थित राहून सादर करण्याचे निर्देश आज राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

ठाण्यात एका तरुणाने मित्रांच्या मदतीने तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी पीडित तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्ट द्वारे तिच्यावरील हल्ल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे पोलिसांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आयोगाच्या निर्देशानंतर ठाणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

आता पोलिसांनी गेल्या आठ दिवसात या प्रकरणी केलेल्या तपासाबाबत व्यक्तिशः उपस्थित राहून अहवाल सादर करावा असे निर्देश आयोगाने दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी यांचेसह वस्तुनिष्ठ अहवाल दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी दु. ३ वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात मा. अध्यक्षा यांच्या समक्ष उपस्थित राहून सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!