स्टेट बँक कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी सुभाष महाजन यांची निवड
डोंबिवली (प्रतिनिधी) : स्टेट बँक कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी सुभाष महाजन यांची निवड करण्यात आली आहे. स्टेट बँक कर्मचारी सेनेचे आठवे त्रैवार्षिक अधिवेशन शिवसेना भवन दादर, येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात महाजन यांची तीन वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाजन यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.
डोंबिवलीचे रहिवासी असलेले ज्येष्ठ समाजसेवक सुभाष महाजन हे विविध संस्था आणि संघटनेवर तसेच शासकीय कमिटीवर कार्यरत आहेत. शिवसेनेच्या संघटनेत तब्बल ३५ वर्षापासून ते एकनिष्ठ आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितेला वसा ते जपत आहेत. स्टेट बँक कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्यावतीने राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तसेच भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची आजीव मेंबरशिप त्यांना प्रदान करण्यात आलीय. तसेच मराठी वृत्तपत्रलेखक संघ यांच्या वतीने देण्यात येणार यंदाचा ‘ पत्रभूषण २०१८ ‘ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. महाजन हे अनेक वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रातही कार्यरत असूूून, विविध वृत्तपत्रात लिखाण करीत आहेत. त्यामुळे त्यांना पत्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सुभाष महाजन हे सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. स्टेट बँक कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने सर्वच क्षेत्रातून महाजन यांचे अभिनंदन होत आहे. **