मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस आणि टेम्पोची धडक
मुंबई : आज पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एस टी बस आणि टेम्पो मध्ये समोरा समोर ठोकर होऊन अपघात झाला. टेम्पो विरूद्ध बाजूने येऊन एस टी वर आपटला. टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बस मधील 35 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.