एसटीच्या संपकरी कर्मचा-यांचे होणार निलंबन, प्रशासनाचा इशारा

मुंबई : एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप दुस-या दिवशीही सुरू असल्याने प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी कामावर न परतणा-या एसटी कर्मचा- यांच निलंबन करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय त्यामुळे कर्मचारी विरूध्द प्रशासन असा वाद  चिघळण्याची शक्यता आहे.

सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांनी  सेामवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला.  मंगळवारी एसटी डेपोमधून एकही एसटी बाहेर न पडल्याने प्रवाशांचे खूपच हाल झाले. ऐन दिवाळीत हा संप सुरू असल्याने प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नव्हता तर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी  25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही असे वक्तव्य केलय. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मात्र दुस-या दिवशीही संप  सुरूच असल्याने एेन सणासुदीत प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे कामावर न परतणा-या कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करून त्या निलंबित कर्मचा-यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचा-यांची भरती करण्याचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आलाय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *