मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून एसटी कामगारांनी प्रलंबीत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. हे आंदोलन मागे घेऊन कर्मचा-यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे मात्र एसटी कर्मचारी ऐकायला तयार नाही. एसटी कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी राज ठाकरे यांची भेट घेतली हेाती. अखेर शुक्रवारी एसटी कर्मचा-यांचा संप मिटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
एसटी कामगारांनी २९ ऑक्टोबरपासून संपाची हाक दिली आहे एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे आणि त्या कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्यावे या मागण्यांसाठी हा संप सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचा-यांनी आंदोलन सुरू केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांमध्ये अनेकवेळा बैठका झाली मात्र आतापर्यंत संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही ऐन दिवाळीत हे आंदोलन झाल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला हेाता. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान एसटी कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या करून जीवन संपवले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज ठाकरे यांनी त्यांच्यापुढं एक अट ठेवली. “मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल,” असं राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितलं. अखेर शुक्रवारी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली एसटी कर्मचा-यांच्या प्रश्नावर चर्चा झाली कर्मचा-यांना सातवा आयोग लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज ठाकरे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.