एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
मुंबई : ऐन सणासुदीच्या दिवशी एसटी कर्मचा-यांनी बंदचे हत्यार उपसल्याने प्रवाशांचे खूपच हाल झाले. संप करू नये असे आवाहन मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते मात्र त्यांचे आवाहनही धुडकावून लावण्यात आले.

सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांनी संपाचे निशान फडकवलं आहे. एसटी डेपोमधून एकही एसटी बाहेर न पडल्याने प्रवाशांचे खूपच हाल झाले. सोमवारी एसटी कर्मचा-यांनी संपाचा इशारा दिला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या दालनात एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठकही झाली. वेतनवाढीबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असून यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्रयानी केले होते. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. अखेर मध्यरात्रीपासूनच एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला. एकिकडे कर्मचा- यांचा संप सुरू असतानाच दुसरीकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही असे वक्तव्य करून एसटी कर्मचा-यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने कर्मचा- यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केलाय. एसटी कर्मचा-याना कामावर हजर राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले मात्र कर्मचा-यांची ही मागणी धुडकावून लावली त्यामुळे एसटी कर्मचारी विरूध्द प्रशासन अशी जुंपली आहे.

राज्यात एसटी कर्मचारी संख्या 1 लाख 7 हजार
एसटी बसची संख्या 17 हजार
एसटीच्या आगारांची संख्या 258,
विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!