मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) येत्या २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मंडळाने राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये ही परीक्षा घेतली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आता या सर्व नऊ विभागांचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण मंडळातील निकाल सर्वाधिक लागला आहे. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष इयत्ता दहावीच्या निकालाकडे लागले आहे.
या पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल
3. https://sscresult.mahahsscboard.in