पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते.
परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून, २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत, असे गोसावी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक असली, तरी निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.