शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला तोबा गर्दी : तब्बल 900 जणांना ऑफर लेटर
कल्याण : शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल 900 जणांना मुलाखतीनंतर लगेचच ऑफर लेटर देण्यात आले. शिवसेना कल्याण शहरप्रमूख विश्वनाथ भोईर यांनी या मेळाव्याचे आयेाजन केल होत. कल्याण पश्चिमेतील वायले नगर येथील साई हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. वेगवेगळ्या सेवा क्षेत्रातील तब्बल 25 नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. कल्याण डोंबिवलीच नव्हे तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून हजारो उमेदवार या मेळाव्यासाठी आले होते. मेळाव्यासाठी खूपच गर्दी झाली होती. हॉलच्या बाहेर रस्त्यावर तरूण तरूणींची ख्राूप मोठी रांग लागली होती.
I am also interested for this job aportunity