सोशल मीडियामूळे त्या बेघर आजीला मिळाला निवारा
पुणे स्माईल प्लस फाउंडेशनचा मदतीचा हात
कल्याण (सचिन सागरे) : सध्याच्या धकाधकीच्या युगात सोशल मिडीयाचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे लांबचे जग जवळ वाटू लागले आहे. अशीच काही किमया कल्याणमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडली आहे. कल्याणातील बिर्ला कॉलेज परिसरात गेले काही महिने एक आजी बेवारस, निराधार, निपचीत पडून होती. जवळील परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने पहिले आणि सोशल मिडीयावर त्या आजीने दिलेल्या माहितीचा विडीओ सर्वाना पाठवला. त्यातून पुण्यातील एका संस्थेने आजीबाईला निवारा मिळवून दिला. त्यामुळे सोशल मिडीयाचा असा चांगला होऊ शकतो हे त्यामुळे स्पष्ट झाले.
येथील पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील कोकण वसाहतीत राहणारा निलेश जगदाळे ह्या तरुणाने बाईकवरून येता जाता एक आजी बेवारस, निराधार, निपचीत बसली असल्याची त्याच्या नजरेस पाडली. गेल्या काही दिवसात थंडी वाढली असल्याने ती कुडकुडत होती. त्या आजीला निवाऱ्याची मदत करता आली का ? ह्या विचाराने निलेश आणि त्याचे सहकारी विचार करत होते. त्यावेळी त्यांनी आजीची विचारपूस केली तिची माहिती घेतली. त्याचा विडीओ तयार करत १ नोव्हेंबरला सोशल मिडीयावर पसरवला मदतीची हाक दिली. अनेकांनी तो व्हिडीओ पाहिला. निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या पुण्यातील स्माईल प्लस फाऊदेशांचे योगेश मालखरे यांनी पाचव्या दिवशी त्यांच्याशी संपर्क साधला. ५ नोव्हेंबरच्या रात्री संस्थेचे अध्यक्ष आणि सदस्य आले. त्यांनी आजीबाईला नेण्याची इच्छा व्यक्त केली. ही बाब पोलिसांना देखील कळविण्यात आले.
त्या आजीबाईला निवार्याची मदत केल्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. आजीला मदत करून समाधान वाटत आहे असे निलेश जगदाळे यांनी सांगितले. त्यांच्या ह्या कामात त्यांचे सहकारी गणेश शेलार, प्रशांत मेस्त्री, स्वप्नील कांबळे, विपुल कांबळे, दिनेश गावडे, दर्शन मर्चंडे, विशाल सुकाळे योगेश राऊत, जयेश चिकणे, राहुल गायकवाड, बाबू शिंदे, गणेश थोरात आदींनी सहकार्य केले.
आजीची माहिती
आजीबाईचे नाव नीलाबाई बाबू राजपूत असे असून त्या मुळच्या सांगली येथील आहेत. त्यांचे वय अंदाजे ६० वर्ष असे त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले.