मुंबई: सामाजिक उद्योगजगता ‘ ह्या विषयी मुंबईच्या ‘कॉलेज ऑफ सोशल वर्क’, ‘निर्मला निकेतन’ च्या ‘ सामाजिक सृजनशीलता आणि उद्योजक्ता केंद्र’ याच्यातर्फे नुकतेच शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय शिबिर पार पडले. समाजातील उद्योगशीलता वाढीस लागून, भावी सामाजिक उद्योजक तयार व्हावे हा शिबिराचा उद्देश होता. शिबिरात मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील सतरा सामाजिक संस्थांमधील ५५ भावी उद्योजकाने सहभागी घेतला. शिबिरात प्रामुख्याने. ‘माविम’, ‘देवकृपा’, ‘अमरदीप’, ‘स्नेहवर्धिनी’ इत्यादी संस्थांनी सहभाग घेतला होता.

कॉलेजच्या प्राचार्या डॉ. लीडवीन डायस ह्यानी शिबिराच्या उद्घटन प्रसंगी बोलताना काही यशस्वी उद्योजकांचा उल्लेख करत त्यांच्या सृजनशीलतेची उदाहरणे दिली. कॉलेजच्या उद्योजकता केंद्राची सुरवात कशी झाली ह्याचा आढावा उपस्थितांना दिला.

प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक नाशिकचे ‘महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ’ चे ‘फादर जोएल नरोना’ यांनी उद्योजकता आणि सामाजिक उद्योजकता यामध्ये फरक स्पष्ट करत समाजिक उद्योगशीलता हे सामाजिक समस्यांवरचा उपाय म्हणून बघितले पाहिजे असा दृष्टिकोन ठेवला. त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून कोणकोणते गुण असले पाहिजेत याचा उल्लेख केला. श्री चैतन्य कल्याणपुरकर यांनी उद्योजक आणि आर्थिक तरतूद यावर मार्गदर्शन केले.

शिबिराची सांगता शिबीरार्थीपैकी काही सुजनशील कल्पना पुढे येते स्टार्टअप सुरु करण्यासाठी कॉलेजकडून सहकार्य आणि पाठपुरावा केला जाण्याचा पुनरुच्चार कॉलेजच्या प्रतिनिधींनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *