कल्याण : कल्याण रामबाग येथील विजय तरुण मंडळातर्फे दरवर्षी गणेशउत्सव मोठया भक्तीभावाने साजरा केला जातो यावर्षी गणेशोत्सवात समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देत मंडळाने सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली आहे. मंडळाने एका उच्चशिक्षीत तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाखाचा निधी दिलाय. त्यामुळे कल्याणच्या विजय तरूण मंडळाचा आदर्श सर्वच मंडळानी घ्यावा असाच आहे.
गेल्या काही वर्षात मंडळातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ,रुग्णांना ,शहीदांच्या कुटुंबाला ,दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे .यंदा उत्सवाचे ५८ वे वर्ष आहे .गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यात मर्यादा आल्या आहेत.विजय तरुण मंडळातर्फे यंदा सजावट, देखावे न करता अत्यंत साधेपणाने गणेशउत्सव साजरा केलाय .गणेशोत्सवासाठी मंडप ,सजावट ,मिरवणूक ,वाद्य,यावर खर्च न करता मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय, मयुरी सूर्यवंशी ही 21 वर्षीय तरुणी ब्रेन ट्युमर आजाराने त्रस्त आहे .या तरूणीच्या उपचारासाठी १ लाख रुपयांचा धनादेश तिच्या आईला आज सुपूर्द करण्यात आला. लहानपणीच मयुरीच्या वडिलांचे निधन झाले,आई घरकाम करून उदरनिर्वाह करते, तिने मयुरीला उच्च शिक्षण दिले मयूरी ने एमबीए केलं आहे. मात्र सहा महिन्यापूर्वी तिला ब्रेन ट्युमर हा आजार बळावला.सहा महिन्यापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र मंडळाकडून मुलीच्या उपचारासाठी १ लाखाची मदत मिळाल्यानंतर तिच्या आईचे अश्रू अनावर झाले तिने मंडळाचे आभार मानले.