स्मार्ट सिटीझनच, स्मार्ट सिटी घडवतील : जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर

ठाणे : ठाणे आणि कल्याण डोंबिवलीला स्मार्ट सिटीज बनवण्यासाठी या शहरांतील नागरीकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळून एकदिलाने काम करावे लागेल. स्मार्ट सिटीझनच, स्मार्ट सिटी घडवतील असे प्रतिपादान जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी केलं. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात स्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या भाषणाने झाला, यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी  कल्याणकर म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी संदर्भात प्रकल्प हाती घेऊन काही महत्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या तर शहराचा विकास गतिशील होईल.  स्मार्ट सिटीवर काम करणाऱ्या सर्वच अभ्यासकांनी, ठाण्यातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या अभियानात हिरीरीने भाग घेऊन ठाण्याला सुंदर बनवता येईल  स्मार्ट ठाणे बनवण्यासाठी स्मार्ट सिटीझन घडवावे लागतील असेही ते म्हणाले. विद्या प्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवत अत्यंत महत्वाच्या विषयावर ही परिषद भरवली हे कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांनी “स्मार्ट ठाणे ” या विषयावर सादरीकरण केले. ठाण्याच्या  भविष्यातील विकासासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी स्मार्ट सीटीज वरील दोन दिवसीय परिषदेत चर्चिलेल्या शोध निबंधांवर प्रकाश टाकला .  राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. या परिषदेस संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वेदवती परांजपे यांनी केले व परिषदेच्या समन्वयिका प्रा नीलम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!