डोंबिवली : चाँकलेट हिरो देवानंद यांच्यावरील “सितारों के तारे” गाण्यांचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात नुकताच पार पडला. नृत्य, संगीत आणि गायन या त्रिवेणी संगम पाहावयास मिळाला. सुरांच्या मैफीलीत डोंबिवलीकर रंगून गेले होते.
अनुजा म्हैसकर यांच्या अभंग नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रायमा आणि त्रिशा यांचे एक युगल कथक नृत्य देखील सादर झाले. आर जे गौरव श्रीवास्तव यांच्या निवेदनाने सितारों के तारे गायला सज्ज झाले. “प्रभुतेरो नाम “असा देवाच्या नावाचे पहिले पुष्प अनघा विद्वांस यांनी वाहीले.”फुलो की रंग से” राणा जाधव यांनी तर “देखने मे भोला है” हे आयुषी देवस्थळे यांनी गाऊन आपण दिसायला लहान पण गातो महान हे दर्शविले. “पिया तोसे नैना लागे रे “हे गीत सुरभी देवस्थळी हिने गाऊन लहान वयात आपली गायकी सिद्ध केली.” कभी खुद पे “या गाण्यातील मूड प्रणव पाटील यांनी अचूक हेरला. मधुरा शेवडे यांचे” जारे जारे उड जा रे पंछी” तसंच अभिजीत करंजकर यांचे” दिल का भवर करे पुकार” ही गाणी अचूकपणे सादर झाली .”तू कहा ये बता” है साहिल जोशी यांच्या गाण्यातील दर्द श्रोतांपर्यंत पोहोचला तर ओंकार प्रभू घाटे यांनी याॅडलींग यशस्वीपणे पेलले. नाट्यसंगीत शास्त्रीय संगीत या बरोबरच हे देखील ऐका असंच ओंकार ने दाखवून दिले. रेश्मा कुलकर्णी यांच्या” मोसे छल” या गाण्याने सुरांची एक मैफलच तिने रंगविले.
सुकांत जावडेकर यांच्या दमदार आवाजात “तेरी जुल्फो से “आणि कैद मांगी थी या गाण्यानी कार्यक्रमाची पुन्हा सुरुवात झाली .निषाद वैद्य यांचे “तेरे मेरे सपने” हे गाणे छानच झाले .भगवंत कुलकर्णी यांनी पहिल्या पर्वातील सीनियर सिटीजन ची यशस्वी घोडदौड अजूनही कायम ठेवल्याचं “खोया खोया चांद” या गाण्यातून सिद्ध केलं तर नंदन जोशी यांनी “आया हू” या गाण्यातील टीकेचा सूरअसा काही पकडला की आपण साठीला आलोय हे कुणाला कळूच नये.”जाता कहा हो “या गाण्यातून मानसी जोशी यांनी यशस्वी टीव्ही गायिका आहे हे सिद्ध केलं. सुषमा धुरी यांनी,” दिवाना मस्ताना” या गाण्यातील लाडीक नखरा छान पेलून दाखवला.” जिया हो जिया हो जिया कुछ बोल दो “या गाण्याने धवल भागवत ने आपल्या गायकीतील एक अनोखा मार्ग चोखाळला. यशस्वीपणे उचलला. पूजा देशपांडे यांच्या” हुस्न के लाखो रंग” या गाण्यातील सूचक हसणं आणि संपूर्ण गाण्याचा बाज अचूक हेरला.” रात अकेली है” या गाण्यात अनन्या नाईक सुरांचा दणकटपणा, आवाज, शब्दातील मूड जो दाखवला त्याला तोड नाही. गाणं एका उंचीवर नेऊन ठेवलं.
निशाद करलगीकर, प्रभाकर भोसेकर ,संतोष दिवेकर ,आशिष आरोसकर ,संदीप पेडणेकर, किरण गायकवाड, संदीप कुलकर्णी, किशोर नारखेडे, नागेश कोळी आणि संगीत संयोजक प्रशांत लळीत हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. सर्व गाण्यांना श्रोत्यांनी उत्तम टाळ्यांनी दाद दिली. समारोपासाठी प्रमुख पाहुणे अवधूत गुप्ते यांचे स्वरमंचावर आगमन झाले आणि रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषाने त्यांचे स्वागत केले. सुधाताई म्हैसकर यांची संकल्पना, त्यांच्या प्रचंड उत्साह याचे अवधूतजींनी मनमोकळेपणाने कौतुक केले आणि काही उदयोन्मुख कलाकारांनी यांचे चित्रपट पाहिलेले नसतानाही देवानंदजींच्या गाण्याने तीन-चार पिढ्यांचे स्मरणरंजन केल्याबद्दल गायकांचे कौतुक केले व रसिकांच्या प्रत्येक फर्माईशीला दात देत ढीपाडी डिपांग, बाई बाई मनमोराचा, कांदेपोहे ,जयजय महाराष्ट्र ही गाणी बेधुंदपणे सादर केली.