कल्याण : कल्याणमधील एका बहिणीने स्वतःचे लिव्हर देऊन भावाला जीवनदान दिले आहे. बहीण भावाच्या मदतीला धावून आली. स्वतःच लिव्हर भावाला देत जीवदान दिल्याने बहिणीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस खात्यात कार्यरत असणाऱ्या भावाचं लिव्हर खराब झालं. भाऊ मरण यातना सहन करत होता. डॉक्टरांनी भावाच्या नातेवाईकांना लिव्हर ट्रान्सप्लांटची सल्ला दिला होता. मात्र लिव्हर कुठे मिळत नव्हते. भावाचा जीव वाचविण्यासाठी बहीण माधुरी काळे हिने क्षणार्धात लिव्हरचा भाग देण्याची तयारी दाखविली. भावाला लिव्हरचा ६५ टक्के भाग देत जीवदान दिले. मुलुंडच्या खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
अभिजित आणि माधुरी हे सख्खे भाऊ बहीण आहेत. शिक्षिका असलेल्या माधुरी या केडीएमसीच्या माजी नगरसेविका आहेत. ही शस्त्रक्रिया २ डिसेंबरला पार पडली असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माधुरी काळे या शिक्षिका आहेत. गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या कल्याण – डोंबिवली पालिकाच्या विजयनगर – आमराई या परिसरातील वेगवेगळ्या प्रभागातून सातत्याने नगरसेविका म्हणून काम करत आहे तर त्यांचे पती प्रशांत काळे हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कोरोना संकटात लॉकडाउन काळातही काळे यांनी अत्यंत मोलाचे काम केले. त्यांचे नियोजनबध्द काम कल्याणकराच्या कायम लक्षात राहील असे सांगण्यात येते. सध्या या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.