सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील खडपडे येथे आज एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. खडपडे परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सहकार्यांसोबत गाडीने तळकटहून कुंभवडेच्या दिशेने जात होते. ते खडपडे येथे आले असता त्यांना रस्त्यालगतच्या जंगलातील ओहोळातून एक पट्टेरी वाघ जात असल्याचे दिसले. वाहन थांबल्याचे पाहून वाघही काहीवेळ एका जाग्यावर स्तब्ध उभा राहिला. त्यानंतर वाघ जंगलात पळाला. या वाघाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!