डोंबिवली, 10 ऑगस्ट 2024: डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शतक महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवानिमित्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. या जीर्णोद्धारासाठी नांदेड येथील व्यावसायिक सुमित मोगरे यांनी मोठ्या श्रद्धेने 30 किलो चांदीची वीट अर्पण करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मंदिर संस्थानचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि मंदिराच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा आहे. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दान देणाऱ्यांचे आभार मानले आहेत आणि या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.