डोंबिवली : येथील श्री गजानन महाराज कृपा सेवा संस्था यांच्यावतीने  सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळयाचे  बुधवार दि २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. 


डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोड येथील राजीव गांधी उद्यानाजवळ श्री गजानन महाराज यांचे एकमेव मंदिर आहे. महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. दरवर्षी या मंदिरात प्रकटदिन सोहळा मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीही प्रकटदिन सोहळयाचे आयेाजन करण्यात आले आहे. या सोहळयासाठी भाविकांनी सहकुटूंब उपस्थित राहून महाराजांच्या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजान महाराज कृपा सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *