डोंबिवली : डोंबिवली पूर्व संत नामदेव पथ येथील “गजानन कृपा” को.ऑ.हा.सोसायटीमधील मीटर बॉक्स मध्ये गुरुवारी भीषण आग लागली मात्र रहिवाश्यांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या बेसमेंट मधील पार्किंगच्या जागेत बिल्डरने बेकायदा थेरपी सेंटर सुरू केले आहे. यातील मशीनवर अधिक लोड आल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा संशय रहिवाशी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणारे बेकायदा थेरपी सेंटर तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी इमारतीतील रहिवाशी करीत आहेत. याची पोलिस आणि पालिका प्रशासन याची दखल घेईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लागल्याने काही काळ सदर परिसरात खुप मोठ भितीचे वातावरण तयार झाले होते. परंतू सदर बिल्डिंग मधे आसलेल्या श्यामराव विठ्ठल बँकेचे शिपाई कर्मचारी महेश लष्कर यांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशामक दलाचे जवान घटना स्थळी पोहचण्या आगोदरच आग विझवण्यात आली.

प्रतक्षदर्शी यांच्या म्हणण्यानुसार सदर बिल्डिंगच्या मीटर बॉक्स मधून स्पार्कींग होवुन स्पोट झाल्याचा मोठा आवाज झाला. या आवाजामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.यावेळी मीटर बॉक्स मध्ये आगीचा भडका उडाला. इमारतीच्या तळ मजल्यावरील श्यामराव विठ्ठल बँकेचे कर्मचारी महेश लष्कर यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून बँकेतील अग्निरोधका द्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आले. वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली.सदर घटनाप्रसंगी, बिल्डिंग मधील रहिवासी जेष्ठ पत्रकार, केंद्रीय ग्राहक दक्षता पथक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुभाष महाजन , पुर्वेश संघवी, धनजय पेंडसे, आणि सोसायटी वॉचमन शिरोडकर यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान ठाकरे पक्षाचे डोंबिवली विभाग प्रमुख प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी तेथील लोकांची गर्दी, आरडा ओरडा पाहून घटना स्थळी धाव घेत अग्नीशमन दलाल फोन करून पाचारण केले. सुभाष महाजन आणि प्रमोद कांबळे यांनी सदर परिस्थिती योग्य रित्या हाताळली. तसेच भाजप कार्यकर्ते अनिल ठक्कर यांनी फोन द्वारे सदर घटनेची महिती महवितरण विभागाला कळवून मोलाचे सहकार्य केले. शॉर्ट सर्किट मुळे परिसरात धूर पसरला होता. मात्र कर्मचारी आणि रहिवाश्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

बिल्डरचा प्रताप ; पकिंगच्या जागेत बेकायदा थेरपी सेंटर …

सदर बिल्डिंग च्या बेसमेंटमध्ये सोसायटीची पार्किंग जागा असूनही बिल्डर अशोक पाटील यांनी  पार्किंगला बंदिस्त करून येथील जागा सोसायटीच्या सदस्यांना विश्वासात न घेता अक्षय पाटील या इसमास भाडे तत्वावर वापरण्याकरीता दिली आहे . या जागेत अक्षय पाटील हे थेरपी सेंटर चालवत आहेत. दर दिवशी येथे उपचार घेण्याकरिता ३०० ते ४०० वयोवृध्द, माहीला आणि पुरूष येत आसतात, आज रहिवासी सोबत या सर्वांचाच जीव धोक्यात होता. एवढी मोठी घटना घडल्या नंतर अक्षय पाटील यांनी अशोक पाटील यांना कॉल करून सांगितल्यावर नंतर देखील तेथे बिल्डर अशोक पाटील फिरकले नाही. काही महिन्या पूर्वी बिल्डिंग मध्ये थेरपी सेंटरच्याच काही माणसांनी हाणामारी केल्याच्या घटना पोलीस ठाण्यात नोंद आहेत असेही रहिवाश्यांनी सांगितले.

बिल्डरवर कारवाईची मागणी

सोसायटी कन्व्हेयन्स झाल्यावर देखील मीटर बिल्डर च्या नावावर कसा असु शकतो? आज अनाधिकृत पणें पार्किंगच्या जागेत लाईट मीटर वापरण्यास परवानगी दिली कोणी? थेरपी साठी वापरात येणाऱ्या मशीन च्या लोड मुळेच शॉर्ट सर्किट झाले का?  या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे आणि बेजबाबदार बिल्डर अशोक पाटील यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का ? अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!