ठाणे : दिवाळी म्हणजे आनंदाचा सण,, मांगल्याचा सण.. गरीब असो वा श्रींमत प्रत्येकजण आपआपल परीने हा सण साजरा करतो
गेली दोन वर्ष दिवाळी साजरी करता आली नाही. त्यामुळे यंदाचा उत्साह अधिकच आहे. दोन दिवसांवर दिवाळी सण आल्याने बाजारपेठा रोषणाई सजल्या आहेत. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. गेल्या आठवडाभरापासून दिवाळीची लगबग सुरु झाली आहे दिवाळी सणासाठी शहरातील दुकाने आणि बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी दिवाळी सण साध्या पध्दतीने साजरा केला. कोरोनामुळे कोणालाही घराबाहेर पडता न आल्याने दिवाळी उत्साह नव्हता. त्यामुळे कोणतीच खरेदी करता आली नव्हती. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाकडून निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीत उत्साह जाणवत आहे. शहरातील बाजारपेठ, दुकान रोषणाई करून सजविण्यात आली आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे फटाक्यांच्या दरातही वाढ झाली आहे. तसेच खाद्यपदार्थ तेल महागल्याने फराळयाच्या किंमतीही वाढल्या आहेत.
दिवाळीसाठी आकाश दिवे मेणाच्या व मातीच्या पणत्यांनी सजेली दुकाने लक्ष वेधून घेत आहेत दिल्ली मुंबई अहमदाबाद येथे तयार केलेले साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध हटल्यानंतर दिवाळी सण आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कर्मचारी बोनसमुळे आनंदी आहेत.