५ हजार  तरुणांना मिळणार ऑन दि स्पाॅट नोकरी, 
डोंबिवलीत ११ मार्चला शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळावा  ….
डोंबिवली :-  शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे आणि  शिवसेना डोंबिवली शहर शाखा व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या वतीने एमआयडीसी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.या मेळाव्यात सुमारे ५ हजार तरुणांना ऑन दि स्पाॅट नोकऱ्या मिळणार आहे अशी माहिती  नगरसेवक म्हात्रे यांनी डोंबिवली जिमखाना येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गोदरेज , टाटा, रिलायन्स, एयरपोर्ट, डिश टी.व्ही. झी मराठी, हिंदुस्थान टाईम्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक, मारुती  सुझुकी, आयटी सेक्टर यासारख्या सुमारे ८० कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात येताना तरुणांनी ३ फोटो, बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन यावे. नोकरीसाठी येणाऱ्यांना वयाची अट नसून अर्धशिक्षित ते सुशिक्षित बेरोजगार तरुण येऊ शकतात. असेही म्हात्रे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!