राम मंदिर जुमला असेल तर या सरकारच्या डीएनएत दोष !
दसरा मेळाव्यातून उध्दव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला 
 
मुंबई : राम मंदिर बांधा, नाही तर तो ही जुमला म्हणून जाहीर करा, मग बघा आम्ही काय करतो.  राम मंदिर तुम्ही उभारू शकत नाही, मग हे NDAचे सरकार नाही, तुमच्या DNA मध्ये काही तरी दोष आहे. २५ नोव्हेंबरला मी अयोध्येला येतोय, तो तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, पण त्यानंतर आम्ही तमाम हिंदूंना एकत्र घेऊन राम मंदिर बांधू. असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर चढविला. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. 
 
आपले पंतप्रधान जगभर फिरतात त्यांच्यामुळे भूगोलात कधी पाहिले नसलेले देशही आम्हाला कळाले हे खरे असले तरी जगभर फिरणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकदाही अयोध्देत का गेले नाहीत हा आमचा प्रश्न आहे. शेजारच्या वाराणसीतून निवडून आलात तरी अयोध्देत मात्र कधी फिरकलात नाहीत तुमच्याकडून जर राम मंदिर बांधायला सुरूवात झाली नाही तर आम्ही ते बांधू राम मंदिर बांधायला छाती किती इंचाची आहे हे लागत नाही तर मनगटात बळ किती आहे हे महत्वाचे आहे असेही उध्दव ठाकरे म्हणाले. राज्य दुष्काळाने होरपळतोय. हीच परिस्थिती कर्नाटकात आहे. आमच्या राज्यात अभ्यास चालू आहे. तिकडे कर्नाटक सरकारने  दुष्काळ जाहीर केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडाव लागेल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपाचे सगळे नेते आता पाच राज्यांमध्ये प्रचाराला जातील आणि मतं मागतील. निवडणूक जिंकल्यावर तरी महागाई कमी होईल का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  पेट्रोल, गॅसची दरवाढ, डॉपरच्या तुलनेतर रुपयाचे गडगडणे यावरून उद्धव यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्‍त्र सोडले. मुख्यमंत्री हे सोसायटीच्या निवडणुकात लक्ष्य घालतात परंतु त्यांना दुष्‍काळाकडे लक्ष्य द्यायला वेळ नाही, अशा शद्बांत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे ..
 
-हे तुमचं प्रेम आहे, माझे काही नाही, ही सर्व शिवसेनाप्रमुख आणि माँ साहेबांची पुण्याई..
-हे शिवसेनेचं अतिविराट रुप आहे, याचं दर्शन घेतो.
-आज जे कोणी सत्तेवर त्यांना सांगण्यासाठी आज सुद्धा हिंदू मेलेला नाही, जागा आहे.
-दसरा मेळावा आहे, विजया दशमीच्या तुम्हाला शुभेच्छा.
-संघ सुद्धा आता कान टोचतो आहे, आम्हाला टोचणं पिचणं जमत नाही आम्ही थेट बोलतो.
-जो कारभार देशात राज्यात सुरू आहे, ते लोकांना आवडत नाही, मग मी बोलू नको.
-कितीवेळा नारे द्यायचे, एकदा सांगून कळत नाही, एकदा मी बोललो ते बोललो.
-धनुष्याबाणाशिवाय रावण दहन करता येत नाही.
-रावण तर दरवर्षी उभा आहेच, पण राम मंदिर उभं राहत नाही.
-कोण किती वक्री झाले तरी त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे.
-आम्हाला बाहेर पडत नाही म्हणून विचारता, मग संघाला का नाही विचारत की त्यांना सत्तेत बाहेर का काढत नाही.
-संघ सुद्धा आता कान टोचतो आहे, आम्हाला टोचणं पिचणं जमत नाही आम्ही थेट बोलतो.
-जो कारभार देशात राज्यात सुरू आहे, ते लोकांना आवडत नाही, मग मी बोलू नको.
-कितीवेळा नारे द्यायचे, एकदा सांगून कळत नाही, एकदा मी बोललो ते बोललो.
​-आता ते अभ्यास करतील, पण तिकडे कर्नाटकने थेट दुष्काळ जाहीर केला
-आज शिवसेनेचे मंत्री दुष्काळी प्रदेशात जात आहेत, मुख्यमंत्री म्हणतात मी सगळे अहवाल घेईल
-आज दुष्काळाची स्थिती आहे, महाराष्ट्रात आहे, कर्नाटकातही आहे
-2014 सालची हवा आता राहिली नाही, त्या हवेमध्ये सुद्धा मी तुमच्या सोबतीने टक्कर दिली, हा अश्वमेध माझ्या महाराष्ट्राने रोखला आहे
-कोण किती वक्री झाले तरी त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे
-आम्हाला बाहेर पडत नाही म्हणून विचारता, मग संघाला का नाही विचारत की त्यांना सत्तेत बाहेर का काढत नाही
-संघ सुद्धा आता कान टोचतो आहे, आम्हाला टोचणं पिचणं जमत नाही आम्ही थेट बोलतो
-जो कारभार देशात राज्यात सुरू आहे, ते लोकांना आवडत नाही, मग मी बोलू नको
-आम्हाला बोलायला बंदी केली तर माईक बंद झाल्यानंतर देखील देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदूत्वाचा आवाज पोहोचेल
-कोणाबरोबर युद्ध बंदी केली होती? पाकिस्तान बरोबर की दहशतवाद्यांशी?
-रमझान असलं की युद्ध बंदी होते, पण नवरात्री-गणपतीत आवाज बंदी होते
-थोडं ‘देशी’बल वाढवा
– तेलाच्या किमती रोखण आमच्या हातात नाही, रविशंकर प्रसाद म्हणाले
 -विष्णुचा अवतार 11 वा अवतार तुमच्या सोबत आहे तरी तुम्हाला महागाई रोखता येत नाही, मग सत्तेत का आहात
-पण तुम्ही सत्तेत आहात मग का रोखू शकत नाही
-नितीन गडकरी जे बोललो त्याला मी निर्लजपणा म्हणतो
-मी सांगतो लोकसभेत तुम्ही 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव घेऊन आलात तर तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहतो
-किती वर्ष झाली सत्ता येऊन पण 370 कलम का रद्द करत नाही?
-पण खोटं बोलून जनतेला फसवत असाल तर एक दिवस हा ज्वालामुखी फुटेल
-तुम्ही स्पष्ट वक्ते असाल तर मोदींना सांगा आम्ही ही वचनं दिली होती
 -मी आता अयोध्येला जाणार आहे
-मला सरसंघचालकांचं अभिनंदन करावसं वाटतं, शिवसेनेचा विचार आज संघानं सुद्धा मान्य केला आहे
-पण खोटं बोलून जनतेला फसवत असाल तर एक दिवस हा ज्वालामुखी फुटेल
-तुम्ही स्पष्ट वक्ते असाल तर मोदींना सांगा आम्ही ही वचनं दिली होती
 -हा विषय साधासुधा नाही, माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत का गेले नाहीत
-25 नोव्हेंबर रोजी मी अयोध्येत जाणार, आणि तिथून हेच प्रश्न विचारेल
-राम मंदिर बांधा, नाही तर तो ही जुमला म्हणून जाहीर करा, मग बघा आम्ही काय करतो
 -दुष्काळ जाहीर करण्यासाठी समिती नेमता, पण नोटाबंदी-पेट्रोल दरवाढ एका रात्रीत होते
-तुम्ही प्रचार करा, जिंकून या पण त्यानंतर महागाई रोखा
-शिर्डीत येतात ना मग दुष्काळी भागात जा, थापा नका मारू त्यांना काही तरी देऊन जा
-मी म्हणतो आमच्या दुष्काळी भागात जाऊन या
-आता निवडणुकीसाठी आमच्या देशाचे प्रधानसेवक आणि त्यांचे राज्यांचे सेवक जातील
-2019 साली आम्हीच येणार, कशाला घ्यायचं तुम्हाला डोक्यावर
-तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान शत्रू, तुम्ही म्हणाल तेव्हा मित्र?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *