महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार : उद्धव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : जे आव्हान देण्यासाठी समोर आहेत, त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनादिन सोहळ्यात केला.

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.  मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू. विकासाच्या आड येणारे नतद्रष्ट आम्ही नाहीत. पण मराठी माणसांचं थडगे बांधून तुमचे इमले बांधले जाणार असतील तर तुमचे थडगे बांधल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का? दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.यावेळी पीडीपीशी युती तोडल्यानंतर भाजपचं अभिनंदन करायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. विधानसभा, लोकसभेत भगवा फडकवण्याआधी जनतेच्या मनात भगवा रुजवा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले.
मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खास ठाकरी शैलीत टीका केली. गेली चार वर्षे मोदींनी जनतेला थापा मारल्या, आता मोदी थापा मारण्यासाठी थेट मंगळावरही जातील, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
शरद पवारांवर निशाणा
पगडीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुनही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका, असे म्हणत उद्धव ठाकरेेंनी जोरदार टीका केली.

स्वबळावर लढू आणि जिंकूही : आदित्य ठाकरे

मुंबई : ”शिवसेनेची स्वबळावर लढण्याची सुरवात झाली आहे.  आणि स्वबळावर जिंकायचं आहे. आता जिंकल्याशिवाय शांत बसू नका. आपल्याला राज्यात सत्ता आणायचीच आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले,  पालघरपासून शिवसेना स्वबळावर लढायला तयार झाली असून, पालघरमध्ये बाकीचे चिटींग करून जिंकले आहेत. एकहाती सत्तेची सुरवात आतापासूनच करायची आहे. . साम, दाम, दंड, भेद वापरणारे तिकडे आहेत. आपण नुसती मतं नाही तर मनही जिंकायची. आजपर्यंत आम्ही स्वतःची ताकद पाहिली नाही. पण, आता स्वबळावरच लढायचे आणि जिंकायचे.”

————

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • आता शिवसैनिकांनी निर्धार करून निघालं पाहिजे, जनतेच्या मनामनात भगवा रुजवा, मग जनता म्हणेल की कुणी थापेबाज येवो आम्ही भगवाच फडकवणार
  • जसं ‘संपर्क अभियान’ त्यांनी घेतलं, तसं तुम्ही सत्यशोधन अभियान करा
  • सरकार जाहिरातींवर खर्च करतंय, पण तुम्ही विचारा कुणाला या योजनांचा फायदा झाला
  • जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल
  • पण डिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याची शक्यता आहे, म्हणून पावसाळी अधिवेशन नागपूर मध्ये घेण्याचं यांनी ठरवल्याची चर्चा आहे
  • नागपुरात पावसाळी अधिवेशन घेणार असाल तर विदर्भासाठी योजना आणा, तर पाठिंबा
  • मराठी माणसांची थडगी बांधून तुमचे इमले उभारणार असाल तर तसं आम्ही तसं होऊ देणार नाही
  • मुंबई गुजरातचं उपनगर करण्याचा यांचा डाव तर नाही ना?
  • मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचं काम कोणी करणार नाही, करेल त्याचे आम्ही तुकडे करू
  • मुंबईला मारून टाकण्याचं काम चाललं आहे
  • त्या मुंबईतून सगळं हलवत आहे
  • माझी मुंबई १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मिळवली
  • बुलेट ट्रेनने कोण जाणार?
  • वांझोटी स्वप्न दाखवायची आणि यांनी पुढे जायचं
  • राजकारण करायचे असेल तर स्वत:ची डोके वापरा, पगडी वापरू नका
  • फुले-टिळक पगडीने होत नाही, तर त्यांच्यामुळे त्या पगडीला महत्व आहे
  • लोकमान्यांची पगडी नकोशी होते, पण इफ्तारची टोपी चालते
  • शरद पवार मराठी माणूस फोडत आहेत
  • हिरवा वरवंटा आमच्यावर येत होतो, तेव्हा शिवरायांनी एकत्र आणून तो वरवंटा तोडला
  • आपली ताकद वाढली आहे, म्हणून विविध लोक आपल्याला बोलवत आहे
  • ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखांविरोधात राजकारण केलं त्यांना राजकारणात आडवं कसं करायचं ते मी दाखवून देतो
  • त्यांनी पुंग्या वाजवायच्या आणि आम्ही डोलवायच्या असं होणार नाही
  • आधी इथल्या देशातल्या हिंदूंचे प्रश्न सोडवा, आम्ही विकतचं दुखणं का घ्यायचं
  • हे विधेयक भाजप घेऊन येणार असेल तर शिवसेना खासदार विरोध करतील
  • असं करायचं असेल तर आधी कश्मीरमध्ये हिंदूंना राहण्याचं का करत नाही?
  • अमित शहा आले म्हणाले एक विधेयक आणतो, बांगलादेशमधले हिंदू इथे आणायचे आहेत पण त्या हिंदूंना ओळखणार कसं
  • पीडीपीशी युती तोडली, म्हणून मी भाजपचं अभिनंदन करतो, आता तुम्ही पाकिस्तानला चिरडून टाका तर तुम्हाला डोक्यावर घेऊ
  • पाकड्यासमोर शरण न जाता मरण पत्करलं त्याला आम्ही मुजरा
  • दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणता मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का केली?
  • देव-देश-धर्म संभाजी महाराजांनी कधी सोडलं नाही
  • अशी तडजोड मी केली तर शिवराय आणि शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाही
  • गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही
  • माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी मला भगवा फडकवयाचा आहे
  • मोदींच्या घरावर तबकडी फिरताना दिसली, आता बातमी येईल मोदी परग्रहावर रवाना कारण आता तिथे थापा मारायच्या आहेत
  • ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्याच्या छातडवर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेल
  • भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे
  • मला असे सैनिक सदस्य नको
  • काल बातमी वाचली, एअरटेलला कॉल करून भाजपचा सदस्य झाला
  • मिस कॉलवरून मला सदस्य नको, अजिबात नको
  • मी पहिली सही केली
  • आजच्या दिवशी आपण सदस्य नोंदणी सुरू केली आहे
  • तमाम शिवसैनिक जिद्दीला पेटला आहे
  • भगवा फडकवणारच हा निश्चय करून पुढे जायला पाहिजे
  • येत वर्ष निवडणुकांच आहे
  • भिऊ नको आम्ही सोबत आहोत असं बोलणारी माणसं आहेत ती जपायची आहे
  • जिंकलो म्हणून माजलो नाही, आणि हरलो म्हणून थांबलो नाही..
  • गेली ५२ वर्ष असंख्य शिवसैनिकांनी अपार मेहनत घेतली, कष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!