डोंबिवली, दि.30 – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार उडाला. अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली तर दरड कोसळून मोठी जीवित हानी झाली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना डोंबिवली येथील शिवसेेनेच्या वतीने शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज जीवनावश्यक 29 वस्तूंचे किट, पाणी, कपडे आदी मदत घेऊन 18 गाड्या रवाना झाल्या. 80 टन विविध प्रकारचे धान्याचा वाटप शिवसेना पदाधिकाऱ्यांसह 200 कार्यकर्ते पूरग्रस्त भागात जाऊन करणार आहेत.कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते सर्व गाड्यांना भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करण्यात आल्या.
यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, कोकणात महाड पोलादपूर , खेड चिपळूण तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पुरामुळे नागरिकांची घरे उद्धवस्त झाली, आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने डोंबिवली शिवसेना शहर शाखा आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे याच्या पुढाकाराने पुरग्रस्तांसाठी ही मदत पोहचवली जात आहे. आज डोंबिवलीतून १८ ट्रक गाड्या रवाना झाल्या असून, कल्याण लोकसभा मतदारसंघातून १७५ गाड्या रवाना होणार आहेत असे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.
( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, linkedin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )