पालघर : पालघरमध्ये १५ जागांचा निकाल हाती आला त्यामध्ये शिवसेना भाजपला प्रत्येकी ५ जागा राष्ट्रवादीला ४ आणि इतरांना एका जागेवर विजय मिळवला आहे पालघरमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला झटका बसला आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती. डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गटातून स्थानिक शिवसैनिकांना उमेदवारी डावलून खासदार राजेंद्र गावित यांनी स्वत:च्यचा मुलाला उमेदवारी दिली हेाती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे रोहित गावितांचा पराभव झाल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देत प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी रोहित गावितांचा पराभव केलाय.

पालघरमध्ये मनसे व भाजपची युती झाली होती. मात्र या युतीचा भाजपला काहीच फायदा झालेला दिसून आला नाही. पालघरमध्ये शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. भाजपच्या एका जागेत वाढ झाली आहे. तर माकपने त्यांची एक जागा कायम राखली आहे. काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.

या पराभवानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. पालघर जिल्हा परिषदमध्ये समाधान कारकनिकाल लागला आहे. शिवसेनेने ५ जागा जिंकल्या आहे यामध्ये एकूण ११ जागा महाविकास आघाडीने जिकल्या आहे. गावित यांच्या जागेसाठी पुढे पुन्हा काम करणार आहोत. शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. ते मान्य करावे लागेल. असे शिंदे म्हणाले.

राजेंद्र गावितांचा राजकीय प्रवास …
पालघर लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावित हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. मुळचे काँग्रेसचे असलेले राजेंद्र गावित यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजप आणि त्यानंतर शिवसेना असा प्रवास केलाय. डहाणू लोकसभा मतदार संघात पालघर हा परिसर येत होता, याठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र २००८ साली पालघर लोकसभा हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी २०१८ साली पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने चिंतामण वगना यांचे सुपूत्र श्रीनिवास वगना यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यावेळी भाजपकडून राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवण्यात आले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या वाटयाला पालघर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटयाला आल्याने गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडून आले.


पालघर निकाल
भाजप : ५
शिवसेना : ५
राष्ट्रवादी : ४
माकप : १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!