मुंबई, दि. २७ः लोकसभा निवडणुकीत राज्यात मिशन ४५ साठी शिवसेनेने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर सेनेने ४० स्टार प्रचारांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक महायुतीतील बड्या नेत्यांचा प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र स्टार प्रचारकाच्या यादीत शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 शिवसेनेच्या स्टार प्रचारक यादीत कोण कोण ?

स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले यांची नावे आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री दिपक सावंत, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार मनिषा कायंदे, मुख्य समन्वयक नरेश म्हस्के, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, प्रवक्ते राहुल लोंढे, उपनेते कृपाल तुमाने, आमदार आशिष जैयस्वाल, पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक किरण पांडव हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *