ठाणे : लखीमपूर खिरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता ठाण्यातही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते मात्र ठाण्याच्या उपमहापौरांचे पती व अन्य शिवसैनिकांनी हातात काठी घेऊन रिक्षा चालकांना मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर शहापूर कसारा आदी परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले ठाण्यात परिवहन सेवा बंद होती त्यामुळे नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचा पर्याय निवडत होते. टीएमटी सेवा बंद असल्याने नागरिकांचे खूपच हाल झाले ठाण्यात तुरळक प्रमाणात रिक्षा सुरू होत्या महाराष्ट्र बंदसाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. काही शिवसैनिकांनी हातात लाठी घेतली हेाती. बंद पुकारला असतानाही काही रिक्षा सुरू होत्या त्याचवेळी टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रम परिसरात शिवसैनिक शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण केली आहे. यावेळी ठाण्याच्या उपमहापौरांचे पतीदेखील यावेळी तिथे उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरुन टीका होताना दिसत आहे.
दरम्यान भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी शिवसेनेवर टीका केली कायदा कायदा सुव्यवस्था ज्यांनी पाळायचा त्यांनीच कायदा हातात घेतला आहे हे निषेधार्ह असून उपमहापौरांचे पती हे दादागिरीने रिक्षा चालकांवर काठी मारून त्यांच्या काचा फोडतात हा कोणता कायदा ? असा सवाल डुंबरे यांनी केलाय.
कल्याणातही शिवसैनिक आक्रमक रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न
कल्याण डोंबिवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस शिवसेनेनेही डोंबिवली कल्याणात निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. तर आवाहन करूनही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा सुरूच ठेवल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरत उपशहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू केली. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांची समजूत काढत बाजूला केले. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते निदर्शांनमध्ये सहभागी झालेले दिसून आले.