शिव नलिनी प्रतिष्ठानकडून पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे
डोंबिवली : उन्हाळा  ऋतूमध्ये पक्षांना पाणी सहजरीत्या उपलब्ध व्हावे यासाठी शिव नलिनी प्रतिष्ठानतर्फे नादिवली रोड परिसरात जागोजागी पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी कृत्रिम पाणवठे ठेवण्यात आलेत.  डीएनसी शाळा परिसर ते नांदिवली रोड या ठिकाणी सदर उपक्रम राबविण्यात आला . सदर कार्यक्रमाचे नियोजन शिव नलिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले होते . या उपक्रमात विधी अधिकारी अॅडव्होकेट प्रदीप बावस्कर , जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे  , शिवनलिनि प्रतिष्ठानचे डोबिवली शहराध्यक्ष अमोल काकडे तसेच स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.  यावेळी ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम पाणवठेचे  वाटप करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *