शिरूर येथील साखर कारखान्याला भीषण आग
पुणे : शिरूर तालुक्यातील मुखई येथील व्यकटेश कृपा साखर कारखान्याला आज संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील बगास जळून खाक झाले. अंदाजे 12 हजार टना पेक्षा अधिक बगास होते. तसेच कारखान्यातील इतर साहित्य जाळले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालंय. अग्नीशमन दलाच्या ५ गाड्या आग विझवण्यासाठी घटना स्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.