कल्याण– कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती, शिंदेगट युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्यासहशेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, सचिव वरुण सरदेसाई, उपनेते कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे.

रविवारी सकाळी दीपेश म्हात्रे यांनी १०० वाहनांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. डोंबिवली विधानसभा मतदार संघातून ते इच्छुक आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उध्दव सेनेकडून दिपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!