अॅड. शशिकांत ठोसर यांचे निधन
डोंबिवली : शिवसेनचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख, नामवंत विधिज्ञ अॅड शशिकांत ठोसर यांचे शनिवारी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. डोंबिवलीत शिवसेना वाढविण्यासाठी त्यांनी खूपच मेहनत घेतली. डोंबिवली नगरपरिषद असताना शिवसेनेचे ते पहिले नगरसेवक ठरले होते. त्यांच्या दिवंगत पत्नी सीमा ठोसर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
डोंबिवली हा जनसंघाचा बालेकिल्ला ओळखला जायचा मात्र या बालेकिल्ल्यात शिवसेनेची पाळेमुळे रूजविण्यात  ठोसर यांचीही प्रमुख भूमिका होती. नामवंत विधिज्ञ असल्याने कायद्याचा गाढा अभ्यास होता. शिवसेनेच्या सामाजिक केसेस ते लढवित. अभिनव सहकारी बँक, ग्रीन्स इंग्लिश स्कूल अशा अनेक संस्थावर त्यांनी अध्यक्ष व संचालकपद भूषविले. डोंबिवली ग्रामीण भागातील गोरगरीब विद्याथ्यांना माफक दरात शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी शिवाई बालक मंदिर या शाळेची उभारणी केली. हिरवाई उत्सव मॅरेथॉन अशा प्रकारचे उपक्रमांची सुरूवात त्यांनी केली. शिवसेना संघटना वाढविण्यासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *