मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी महाविकास आघाडी झाली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी विरूध्द महायुती असा सामना होणार आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर काँग्रेसने ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे आतापर्यंत २९ उमेदवार जाहीर झाले आहेत.
‘हे’ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार
वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्करराव भगरे
बारामती- सुप्रिया सुळे
शिरुर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके