त्या तरूणांच्या पाठीशी उभं राहू : शरद पवार
मुंबई : सोशल मिडीयावर सरकारविरोधी लिखाण करणा-या राज्यभरातील जवळपास ७० तरूणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या होत्या. त्या तरूणांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पक्षीय दृष्टीकोनातून नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्रयाची गळचेपी करणा-या प्रवृत्ती विरोधात त्या तरूणांच्या पाठीशी उभं राहू असे आश्वासन पवारांनी त्यांना दिलय.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट तयार करण्यात आलं होत. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. या तरुणांच्या विरोधात नोटिसा व खटले भरले जात आहेत. त्यासंबंधी कायदेशीर सल्लागारांमार्फत सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत असेही शरद पवारांनी स्पष्ट केलयं.
