मुंबई : लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी भारतीच्या वतीने २७ नोव्हेंबरला माटुंगा (पश्चिम) येथील कस्तुरबा महिला मंडळ सभागृह माटूंगा पश्चिम येथे बालविवाह विरोधी आक्रेाश मांडणा-या उलकाकल्लोळ कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला शरद पवार ,सुबोध भावे , सुप्रिया सुळे , सुभाष देसाई , भाई जगताप यांनी दिला पाठिंबा दर्शविला आहे अशी माहिती विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.
दरवर्षी विविध सामाजिक घडामोडिंना लक्षात घेऊन विद्यार्थी भारती आपला वर्धापन दिन साजरे करत आली आहे. लॉकडाऊन च्या काळात वाढत्या बालविवाहाचे प्रमाण व घटत्या शिक्षणाच्या प्रमाणामुळे विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी बालविवाह आणि शिक्षण असा विषय घेऊन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जनजागृती चे काम करत आहे त्याचवेळी अनेक मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात येणार आहे. यावेळी एकपात्री अभिनय, नृत्य,पथनाट्य, लघुचित्रपट, कविता सादरीकरण , अनेक वक्त्यांचे मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. अधिक माहिती साठी संपर्क- साक्षी भोईर :- 8830640563 शुभम राऊत : – 9029616190
पुरस्काराचे मानकरी …
प्रज्ञा पवार , वंदना खरे यांना कविता महाजन पुरस्कार तर हरीश सदानी यांना शकुंतला परांजपे पुरस्कार जाहीर .
1) वंदना खरे ताई (कविता महाजन)
2)प्रज्ञा पवार ताई (कविता महाजन)
3)मा. ज्योती ताई बडेकर(सावित्री पुरस्कार)
4)मा. विद्या ताई चव्हाण(सावित्री पुरस्कार)
5)मा.विजेता ताई भोनकर(रमाई पुरस्कार)
6)मा.स्मिता ताई साळुंखे(रमाई पुरस्कार)
7)मा.पूजा ताई बडेकर(कार्यरत पुरस्कार)
8)मा. गुडडी तिवाळ(कार्यरत पुरस्कार)
9)सलोनी तोडकरी ( विद्यार्थी रत्न पुरस्कार)
10)पूजा मुधाने (विद्यार्थी रत्न पुरस्कार)
11)अस्मा (विद्यार्थी रत्न पुरस्कार)
12)मा. हरीश सदानी (शंकूतला परांजपे पुरस्कार)
13)मा.मेहुल जैन( पालक पुरस्कार )
14)मा.हरी नरके ( पालक पुरस्कार)
15) मा.संतोष शिंदे (कार्यरत पुरस्कार)
16)हेमांगी कवी ताई ( स्मिता पाटील पुरस्कार)
17)मा. दिपाली ताई बडेकर (स्मिता पाटील पुरस्कार)
19)मा.हेरंब कुलकर्णी( कार्यरत पुरस्कार)
20) मा.वर्षा विद्या विलास (कार्यरत पुरस्कार)21)मा. प्रमिती नरके(स्मिता पाटील पुरस्कार)