शरद भावे सन्मान सेवा पुरस्काराने सन्मानित
घाटकोपर : नवी मुंबईतील साप्ताहिक वार्तादिपने तपपूर्ती पूर्ण केल्याने वर्धापन दिनानिमित्त 12 वर्ष समाजसेवेशी नाळ जोडून असणा-यांना गौरविण्यात आले. यंदाचा समाजसेवेचा सन्मान सेवा पुरस्कार घाटकोपरचे समाजसेवक शरद भावे यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मुंबईतील समाजसेवेला वाहून घेतलेल्या 50 व्यक्तींचा आणि निवडक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दलचा सन्मान सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले . वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात या आयोजित रविवारी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल हेाते. शरद भावे हे सहकार क्षेत्राशी निगडित आहे . अनेक सामाजिक संस्थांवर ते पदावर कार्यरत असून गोरगरीब , अनाथ मुलं , विधवा महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ते कार्य करतात . गतवर्षी घाटकोपर मधील दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांनी विभागातून मोफत घर ते स्टेशन असा वाहन प्रवास सुरु केला होता या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमुर्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व तुळस आणि सन्मान पत्रक देऊन गौरवीत केले . या कार्यक्रमाला संपादक राजेंद्र घरत , ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर , माजी प्राचार्य डॉ अजित मगदूम , साहित्यिक साहेबराव ठाणगे , गायक , संगीतकार अविनाश हांडे , अभिनेत्री , नृत्यांगना सविता हांडे हे उपस्थित हेाते.