*शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार*

ठाणे : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर गुरुवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मीरा रोड येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मेजर राणे यांचे पार्थीव श्रीनगरवरुन आज दुपारी १२.३० वाजता विमानाने दिल्लीलारवाना होऊन दु. २.१५ मिनिटाने दिल्लीला पोहचले.  तसेच दिल्लीहून पार्थीव पुढीलप्रवासाकरीता ४ वाजता निघून मुंबई एअरपेार्टला ६.३० वाजेपर्यंत पोहचण्याचीशक्यता आहे. त्यांचे पार्थिव रात्री मालाड येथील शवगृहात ठेवण्यात येऊन उद्या गुरुवारी 9 ऑगस्ट रोजी ते मीरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी परिवार आणि नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी मीरा रोड येथील स्मशानभूमीत आणले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *