ठाणे, अविनाश उबाळे : शहापूर तालुक्यातील वासिंद ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. वासिंद वार्ड क्रमांक ३ चे उमेदवार विलास (बाळूशेठ) धोंडू जगे हे (हिरा) या निशाणीवर रिंगणात उतरले आहेत. जगे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांच पारडं जड झालं आहे.

वासिंदचा विकास हाच ध्यास

वासिंद शहराच्या विकासाचा ध्यास मनाशी बाळगून विलास (बाळूशेठ) धोंडू जगे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांचा त्यांना मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे. वासिंद शहरातील नागरी विकास कामांना प्रथम प्राधान्य देणाऱ्या जगे हे भरघोस मताधिक्यांनी विजयी होती असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर गेल्यास वासिंद शहरातील विकास कामांना सर्वप्रथम प्राधान्य राहील असेही त्यांनी सांगितले.

सरस्वती विद्यालयातील संस्थेचा अनागोंदी कारभार असो किंवा वासिंद शहरातील नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन असो बाळू शेठ जगे यांनी नेहमी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर आपलं मत परखडपणे मांडून सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहिले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, गोरगरीब जनतेची कामे झाली पाहिजेत. जो नागरिक रहिवासी ग्रामपंचायतीस कर भरतो, त्याला मुलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत असं यासाठीच निवडणूक उतरल्याचे मत बाळू शेठ जगे यांनी सांगितले.

राजकारणापेक्षा समाजकारणाकडे ओढा

बाळूशेठ म्हणूनच सर्वसामान्यांमध्ये त्यांची ओळख आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व असल्याने लोकनेते म्हणूनच जनमाणसात त्यांची प्रतिमा आहे. निस्वार्थी, मनमिळाऊ,आणि सेवाभावी, अशी ओळख असल्याने सर्वसामान्य जनतेतून मोठया प्रमाणात पसंती मिळत आहे. वासिंद शहराच्या विकासासाठी बाळूशेठ जगे यांना मोठ्या मतधिक्क्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!