डोंबिवली ;- डोंबिवली ग्रामीण भागात काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांच्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत.


डोंबिवली पूर्वेकडून ग्रामीण भागात सदर पीडित वर्षीय अल्पवयीन मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची या अल्पवयीन पीडितेवर वाईट नजर होती . गेल्या वर्षभरापासून हा नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता . याबाबत कोणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही अशी धमकी या नरधमाने पिडितेला दिली होती . त्रास असह्य झाल्याने पीडीतेने याबाबत आपल्या आईला माहिती दिली. या प्रकरणी पीडीतेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!