मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचा वाढदिवस पत्रकार संघात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, कार्यकारीणी सदस्य अंशुमन पोयरेकर, आवाज इंडियाचे न्यूज एडिटर अजय चांदेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप कोचरेकर, पत्रकार संतोष गायकवाड, रवींद्र भोजने, शिरीष वानखेडे, रमेश आवताडे, प्रशांत कांबळे, उमेश गुजराथी, सुबोध शाक्यरत्न, राजेंद्र साळसकर, अकबर खान, आणि पत्रकार संघातील कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पत्रकार राही भिडे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथे सामजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सुर्यवंशी यांनी सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला. अशाच प्रकारचे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले.
***



