डोंबिवली. :महाराष्ट्रातील नामवंत लेखिका व डोंबिवलीकर लिलाताई शहा यांचे आज पहाटे स्पंदन हॉस्पिटल डोंबिवली येथे दुःखद निधन झाले. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांना मुलगा, मुलगी, सुन, नातवंड, पणती असा मोठा परिवार आहे.
मूर्ती लहान पण किर्ती महान, अश्या दिसायला छान व चुणचुणीत आणि वय वर्षे केवळ ८७ असलेल्या या गोड आजी म्हणजे लीला शहा! बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत, विविध विषयांवरील अशी ६८ पुस्तकं आजवर त्यांनी लिहिली. त्यांनी स्वतः २०० गाणीसुद्धा लिहिलीत.
लीलाताईंना आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या ३ पुरस्कारांसह, ८५ विविध पुरस्कार मिळालेत. २०१७ ला अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे मानाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. लिलाताईंनी ३२ पुस्तकांचं पुनःप्रकाशन एकाच वेळी करण्याचा अनोखा विक्रम केला होता.