रमेश औताडे / मुंबई
मुंबई : सार्वजनिक बाधकाम विभागात कामे आणि देयके मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी अनिष शेंडगे यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिला.
कार्यकारी अभियंता, एकात्मीकृत घटक आणि मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई या कार्यालयातून देण्यात येणारी सर्व कामे हि ठेकेदार सोबत संगममत करून दिली जातात व कामांची देयके सुद्धा अधिका-यांच्या जवळच्या ठेकेदारांना दिली जातात . या अन्यायाविरोधात अनिष शेंडगे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
निविदा प्रक्रीये मध्ये बीड कॅपासिटी हा खूप महत्वाचा कागदोपत्री पुरावा आहे . शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे
सर्व नियम अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर कंत्राट मिळत असते. मात्र आपल्याच मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट व देयके दिली जातात. त्यामुळे या कार्यालयात भरल्या गेलेल्या सर्व निविदांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यांनी केली आहे. प्रत्येक ठेक्दाराची सही त्याच्या अधिकृत सही सोबत जुळते का याचीही चौकशी व्हावी अशी मागणी अनिष शेंडगे यांनी यावेळी केली.
बांधकाम विभागातील सर्व कार्यकारी अभियंता एवढे चतुर व्यक्ती आहेत कि शासना कडून केव्हा निधी येईल आणि आम्ही केलेल्या कामांचा ” मोबदला ” आम्हाला भेटेल. पण जेव्हा पासून एकात्मीकृत गटक, फोर्ट भूषण फेगडे यांनी ताबा घेतला आणि मध्य मुंबई, वरळी याचा ताबा महेंद्र पाटील यांनी घेतला आणि उत्तर मुंबई, अंधेरी, याचा ताबा सचिन धात्रक यांनी घेतला तेव्हा पासून त्यांचेच ठेकेदार काम करत आहेत असा आरोप शेंडगे यांनी केला.
या कार्यकारी अभियंता यांनी विभागाचा ताबा घेतला आहे तेव्हा पासून आज पर्यंत त्यांनी जास्तीत जास्त त्यांच्या जवळच्या ठेकेदारांची देयके अदा केली आहेत. याचीही चौकशी लावणे.अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे.